राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी पी त्रिपाठी यांचं निधन

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी पी त्रिपाठी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार

Updated: Jan 2, 2020, 03:07 PM IST
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी पी त्रिपाठी यांचं निधन title=

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी पी त्रिपाठी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी डी पी त्रिपाठी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ते एक हुशार व्यक्तिमत्व होतं, राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी, तसेच राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांनी एक ठाम भूमिका पार पाडल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते 67 वर्षांचे होते.

तर अजित पवारांनी डी पी त्रिपाठी यांचं निधन हे राष्ट्रवादीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. डी पी त्रिपाठी यांचे आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी खूप चांगले संबंध होते, असं अजित पवारांनी सांगितलं.

तर राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून डी पी त्रिपाठी हे शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत होते. आमच्याशी त्यांचा खूप चांगला सलोखा होता, घरातील ते एका व्यक्तिसारखे आम्हाला होते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.