राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार?

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी करणार आहे. 

Updated: Feb 12, 2021, 10:04 PM IST
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार?

मुंबई : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी करणार आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात प्रफुल पटेल यांना पुन्हा इडी समन्स करणार असून प्रफुल पटेल यांना मुंबईतील इडी कार्यालयात चौकशी करता पुन्हा हजर रहावं लागणार आहे. गँगस्टर इकबाल मिर्ची उर्फ इकबाल मेमन याच्याशी मालमत्ता खरेदी प्रकरणी संबंध असल्याच्या आरोपांमुळे प्रफुल पटेल यांची जवळपास ११ तास चौकशी केली गेली होती.मिलेनियम डेव्हलपर्सच्या माध्यमातून मिर्ची, त्याची पत्नी मेहरा हिच्याशी व्यवहार केला आहे का? य़ाबाबत चौकशी पुन्हा होऊ शकते. 

गेल्या आठवड्यात इडीने इक्बाल मिर्ची, DHFL चे माजी प्रवर्तक कपील वाधवान आणि मिर्चीच्या कुटूंबांतील काही सदस्यां विरोध न्यायालयात पुरवणी आरोप पत्र दाखल केले होते. 

2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात एकदा प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली आहे. परंतु आता एजन्सी पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री यांना चौकशीसाठी बोलविण्याची तयारी करत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप आहे की त्यांनी ही संपत्ती दाऊद इब्राहिमच्या जवळचा इकबाल मिर्चीकडून खरेदी केली होती. प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमध्ये फ्लॅट आहेत. ते इक्बाल मिर्चीशी झालेल्या कराराशी संबंधित आहेत.

एजन्सीचा असा दावा आहे की सन 2007 मध्ये या मालमत्तेवर करार झाला होता . पण प्रफुल्ल पटेल यांनी सातत्याने हे आरोप फेटाळले आहेत.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात, सीजे हाऊसमध्ये हजर असलेल्या इक्बाल मिर्चीची काही मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने सीज केली आहे. मनी लाँड्रिंगशी संबंधित या प्रकरणात ईडी पीएमएलए अंतर्गत कारवाई करीत आहे, तर आरोपपत्रही दाखल केले गेले आहे.

या प्रकरणात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाची अनेक मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली असून या कंपनीची मुंबईव्यतिरिक्त युएईमध्येही मालमत्ता आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात इक्बाल मिर्ची याच्या मुलाचा उल्लेखही केला आहे, ज्यांच्यावर ड्रग्ससह बेकायदेशीर कार्यात सहभागी असल्याचा आरोप होता.

बातमी: फ्रिकेमध्ये विचित्र आजाराचा फैलाव, माणसाचा तडकाफडकी अंत