मेघा कुचिक, मुंबई : बॉलिवूडमध्ये खोलवर रुजलेली ड्रग्जची पाळमुळं खणून काढण्याचा या अधिकाऱ्यानं चंग बांधला आहे. त्यांचा दबदबा आणि दरारा एवढा की बडेबडे सेलिब्रेटीही त्यांना वचकून असतात.
समीर ज्ञानदेव वानखेडे... NCBचे झोनल डायरेक्टर. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग अॅडिक्शन ऐरणीवर आलं. हे चक्रव्यह मोडून काढण्याचा चंग समीर वानखेडेंनी बांधला. भल्याभल्यांना चौकशीसाठी बोलावलं. NCB ऑफीसमध्ये टेचात येणाऱ्या सेलिब्रेटींना वानखेडेंनी प्रश्न विचारायला सुरूवात केली की घाम फुटतो म्हणे... त्यांची पत्नी बॉलिवूडमधली आहे... प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर त्यांची क्लासमेट... 2017 मध्ये लग्न झालं. त्यांना जुळ्या मुली आहेत. दोघं एकमेकांच्या कामात बिलकुल ढवळाढवळ करत नाहीत. समीर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल क्रांती भरभरून बोलते.
वानखेडेंना शिस्तीचं आणि कार्यरत राहण्याचं बाळकडू मिळालं आईवडिलांकडून.... वडील एक्साईज डिपार्टमेंटमध्ये उपअधीक्षक होते. तर आई जाहिदा समाजसेविका... दुर्गा या सामाजिक संस्थेतून त्यांनी 200 अनाथांना आधार दिला. त्यांच्या पश्चात समीर यांच्या भगिनी अॅड जास्मिन वानखेडे ही संस्था सांभाळतात.
रुईया कॉलेजमधील त्यांचे प्राध्यापक समीर यांच्या आठवणी आवर्जून सांगतात. साऱ्या बॉलीवूडला हदरवणाऱ्या हा मराठी अधिकारी महाराष्ट्राची शान असून साऱ्या महाराष्ट्राला समीर वानखेडे यांचा अभिमान आहे.
समीर वानखेडे एअरपोर्टवर उपायुक्तपदी होते, तेव्हापासून त्यांची भीती सेलिब्रेटींच्या मनात आहे. बड्याबड्या सेलिब्रेटीज विमानातून बाहेर पडताना वानखेडे ड्युटीवर आहेत का, याची चौकशी करत असत म्हणे. आता ही भीती शंभर पटींनी वाढली असणार.
पाहा स्पेशल रिपोर्ट