मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स

मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 

Updated: Sep 17, 2017, 02:39 PM IST
मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स  title=

मुंबई : मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 

मुंबईपासून जवळच असलेल्या शहापूर-मुरबाडकरांसाठी टिटवाळा-मुरबाड असा नवा रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे. २६ किमी मर्गाच्या या प्रकल्पाचं सर्वेक्षणही पूर्ण झालंय. या मार्गावर तीन नवी स्थानकं उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रथम एकच मार्गिका उभारण्यात येणार आहे. यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

याशिवाय मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून स्वतंत्ररित्या विरार-वसई-पनवेल  अशा 70 किमीच्या पट्ट्यात दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प आणि एमयूटीपी-3 अंतर्गत विरार-डहाणू या 64 किमीच्या पट्टयाचं चौपदरीकरण केलं जाणार आहे.या प्रकल्पात 11 नवी स्थानकं असतील. शिवाय एमयूटीपी-3 अंतर्गत कळवा ते ऐरोली हा जोडमार्ग केला जाणार असून या प्रकल्पाअंतर्गत ठाणे ते ऐरोली या दोन स्थानकांमध्ये दिघा हे नवं स्थानक उभारण्यात येणार आहे. तसंच ठाणे मुलुंड दरम्यानही नवं स्थानक उभारण्यात येणार आहे.

नवी स्टेशन्स

टिटवाळा ते मुरबाड मार्ग : तीन स्टेशन्स – घोडसाई, पाटेगाव, किशोर

विरार ते डहाणू चौपदरीकरण : आठ स्टेशन्स – वाधवी, सारतोडी, माकुन्सर, चिंतुपाडा, खराळे रोड, पांचाली, वंजारवाडा, बीएसईएस कॉलनी

विरार -वसई – पनवेल दुहेरी मार्ग : ११ स्टेशन्स – नवीन पनवेल, टेंबोडे, पिंढर, निघू, निरवली, नांदिवली, नवी डोंबिवली, पिंपळास, कलवार, डुंगे, पायेगाव.

ठाणे ते मुलुंड – एक स्टेशन

ठाणे ते ऐरोली – दिघे स्टेशन