वाहतूक नियमनासाठी सीएसएमटी चौकात सुशोभिकरण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चौक नव्या रुपात...

Updated: Nov 3, 2019, 05:24 PM IST
वाहतूक नियमनासाठी सीएसएमटी चौकात सुशोभिकरण title=

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चौक नव्या रुपात नागरिकांना पाहायला मिळणार आहे. न्यूयार्क 'टाइम्स स्क्वेअर'च्या धर्तीवर वाहतूक नियमनासाठी हे सुशोभीकरण करण्यात आलं आहे.

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चौकात, सुशोभीकरणाने पालिकेसमोरच्या या रस्त्याचं रुपडं पालटलं आहे. न्यूयार्कमधल्या 'टाइम्स स्क्वेअर'च्या धर्तीवर वाहतूक नियमनासाठी सुशोभीकरण केलंय. ग्लोबल स्ट्रीट डिजाईन गाईडच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित हे काम केलं जातंय.

  

या सुशोभिकरण केलेल्या चौकात बसण्यासाठी काही बेंचही लावण्यात आले आहेत. या बदलांनंतर रस्त्यावरुन चालणंही सोयिस्कर होणार आहे. या सुशोभिकरणानंतर नागरिकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.