Nitesh Rane Tweet : व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा

नारायण राणेंपाठोपाठ नितेश राणेंचं ट्विट 

Updated: Aug 25, 2021, 09:15 AM IST
Nitesh Rane Tweet : व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा  title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंगळवारी रात्री उशिरा जामीनावर सुटका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्रात अनेक पडसाद उमटले. यानंतर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेला इशारा दिला आहे. 

नितेश राणेंचं ट्विट 

नारायण राणे यांनी हे ट्वीट केलेलं असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एकदा शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी याच्या एका सिनेमातील दृष्य शेअर करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी याच्या सिनेमातील एक डायलॉग शेअर केला आहे. 'मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी.... करारा जवाब मिलेगा... करारा जवाब मिलेगा' 

नारायण राणे यांचं दोन शब्दाचं ट्विट 

दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र नारायण राणे यांनी 'सत्यमेव जयते' असं दोन शब्दांचं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नारायण राणे (narayan rane) यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची (Police) मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पहिलं ट्वीट केलं आहे. केवळ दोन शब्दात राणेंनी ट्वीट केलं. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.