माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणाऱ्याची शिवसैनिकांकडून धुलाई

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला आहे.  

Updated: Feb 21, 2020, 10:38 PM IST
माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणाऱ्याची शिवसैनिकांकडून धुलाई
Pic Courtesy : Facebook Nitin Nandgaonkar page

मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला आहे. माटुंगा रेल्वे स्थानक इथे छेडछाड करण्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला होता. मात्र समोर कोणी येऊन तक्रार न केल्याने आरोपीला सोडून देण्यात आले होते. हे आरोपी मोकाट राहिले आणि यांना धडा शिकवला नाही तर हे असेच कृत्य करतील यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी या छेड काढणाऱ्या तरुणाला शोधून काढले आणि चांगलाच चोप दिला. याचा व्हिडियो त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केला आहे.

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची तरुणाकडून छेडछाड

माटुंगा रेल्वे स्थानकावर मुलीची छेडछाड

नितीन नांदगावकर यांनी छेड काढणाऱ्या या तरुणाचा पंधरा दिवसापासून शोध घेत होते. याला पकडून चांगलाच चोप दिला आला आहे. चोप दिलेलेला व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा विकृत माणसाला धडा शिकवायला हवा. म्हणून मी त्याला असा धडा शिकवला आहे. पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल, पण मी असे कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही, असे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.