मुंबईतील जीएसटी भवनला लागलेली आग आटोक्यात, सर्व कर्मचारी सुखरूप

 माझगावच्या जीएसटी भवनला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे.  

Updated: Feb 17, 2020, 06:07 PM IST
मुंबईतील जीएसटी भवनला लागलेली आग आटोक्यात, सर्व कर्मचारी सुखरूप

मुंबई : शहरातील माझगावच्या जीएसटी भवनला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. जीएसटीच्या नव्या इमारतीला ही आग लागली होती. आठव्या आणि नवव्या मजल्याला ही आग लागली होती. आगीचे कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. जीएसटीचे सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र सर्व मजूरही इमारतीच्या बाहेर असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

घटनास्थळी धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत होते. सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. १०० पेक्षा जास्त कर्मचारी हे आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केलं आहे. ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.