'झाडांची कत्तल करून विकास होऊ शकत नाही'

आमचा विकासाला विरोध नाही. पण झाडांची कत्तल करुन विकास होऊ शकत नाही

Updated: Aug 20, 2017, 11:10 PM IST
'झाडांची कत्तल करून विकास होऊ शकत नाही' title=

मुंबई : आमचा विकासाला विरोध नाही, पण झाडांची कत्तल करुन विकास होऊ शकत नाही, असं मत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मांडत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला लक्ष्य केलं.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या आरेमध्ये वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडला. प्रस्तावित मेट्रो कारशेडपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही वृक्षलागवड करण्यात आली. बुर्हानी फाऊंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आरे मध्ये एक हजार वृक्षलागवडीचा संकल्प बुर्हानी फाउंडेशननं सोडलाय. आरेबाबत पर्यावरण अहवाल सादर करताना मुख्यमंत्र्यांना फसवलं गेलंय. आरेमध्ये फक्त उंदीर नाहीत तर बिबट्या आणि अन्य प्राण्यांच्या दुर्मीळ जाती आहेत आणि त्याचे पुरावेही देण्यात आले असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.