close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तेल लावलेल्या पैलवानांच्या गर्दीतही आखाडा रिकामाच

तेल लावून, षड्डू ठोकून गडी आखाड्यात उतरले खरे, पण... 

Updated: Nov 6, 2019, 09:26 PM IST
तेल लावलेल्या पैलवानांच्या गर्दीतही आखाडा रिकामाच

मुंबई : निवडणुकीच्या आधी कुस्ती, आखाड्यावरुन महाराष्ट्रातल्या पैलवानांमध्ये जोरदार जुंपली होती. पण निकालाला आज चौदा दिवस उलटून गेले तरी खरा पैलवान कोण? याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. 

तेल लावून, षड्डू ठोकून गडी आखाड्यात उतरले खरे... खरा पैलवान कोण? हा सवाल करत मोठमोठ्या बतावण्याही झाल्या... पण निकाल लागल्याच्या चौदाव्या दिवशीही महाराष्ट्राचा आखाडा रिकामाच राहिलाय. एकही पैलवान सरकार स्थापन करतो, म्हणत षड्डू ठोकून पुढे आलेला नाही. 

मतदारराजानं निकालात अशी काही पाचर मारली की गेले १४ दिवस सगळ्याच पक्षाचे पैलवान फक्त तेल लावत बसलेत. महाराष्ट्राचा मातीचा आखाडा खऱ्या पैलवानाची वाट पाहतोय. कोण लावणार ठोकणार षड्डू? चला मैदान मोकळं आहे?