जनावरांच्या खरेदी - विक्री निर्बंधाचा आठवडी बाजारावर परिणाम नाही : जानकर

केंद्र सरकारने जनावरांच्या खरेदी - विक्रीवर घातलेल्या निर्बंधाचा आठवडी बाजारावर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 30, 2017, 07:34 PM IST
जनावरांच्या खरेदी - विक्री निर्बंधाचा आठवडी बाजारावर परिणाम नाही : जानकर title=

मुंबई : केंद्र सरकारने जनावरांच्या खरेदी - विक्रीवर घातलेल्या निर्बंधाचा आठवडी बाजारावर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.

राज्य सरकारने गायींच्या संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.  या गोशाळेत शेतकऱ्यांची भाकड जनावर सांभाळली जाणार आहेत. तसेच गाय दुभती झाल्यावर  शेतकऱ्यांना ती घरी घेऊन जाता येणार आहे.
 
गोशाळेत जनावरं सांभाळण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार असल्याचं जानकर यांनी सांगिकले. आठवडी बाजारातली जनावरं कत्तलखान्यासाठी खरेदी, विक्री करण्यावर बंदी घालण्यात आलीय. 

गाय, बैल, वासरू, म्हैस, रेडा आणि रेडकू यांच्या खऱेदी-विक्रीसाठी नव्या अटी घालण्यात आल्या आहेत. 
जनावरे विकताना ती कत्तलखान्यात जाणार नाहीत, याची लेखी हमी विक्री करणाऱ्याला स्थानिक बाजार समितीला द्यावी लागणार आहे. यामुळे शेतक-यांसमोर भाकड जनावरे सांभाळण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.