मुंबईकरांच्या मालमत्ता करमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

५०० चौरस फूटांचं घर असलेल्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे.

Updated: Jul 6, 2017, 06:23 PM IST
मुंबईकरांच्या मालमत्ता करमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती  title=

मुंबई : ५०० चौरस फूटांचं घर असलेल्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. तर ५०० ते ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात ६० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या ठरावाची सूचना पालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आलीय. सभागृह नेते यशवंत जाधवांना ठरवाची सूचना मांडली. ही ठरावाची सूचना आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर आयुक्त नगरविकास विभागाच्या मंजुरीसाठी पाठवतील. त्यामुळं मालमत्ता कराबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती असेल. मात्र शिवसेनेनं महापालिका निवडणुकीत वचननाम्यात दिलेल्या वचनाची पूर्ती केलीय.