ती शिवसेनेची भूमिका नाही; 'कराची स्वीट्स' प्रकरणी संजय राऊतांचं स्पष्टीकरण

पाहा नेमकं काय झालं होतं.

Updated: Nov 20, 2020, 07:47 AM IST
ती शिवसेनेची भूमिका नाही; 'कराची स्वीट्स' प्रकरणी संजय राऊतांचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : शिवसेना कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्स या वांद्रे इथं असणाऱ्या दुकानाचं नाव बदलण्याची मागणी करत दुसरं नाव ठेवण्याती विचारणा दुकान मालकांना केली. पण, शिवसेना shivsena नेते संजय राऊत sanjay raut यांनी मात्र या भूमिकेवरच निशाणा साधला. 

ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत राऊतांनी अशा प्रकारची मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचं म्हणत पक्षाची बाजू स्पष्ट केली. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स हे मागील 60 वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळं दुकानाच्या नावात बदल करण्याच्या मागणीत काहीच तथ्य नाही. मुळात या दुकानाच्या नावात बदल करण्याची मागणी करणं ही शिवसेनेची भूमिका नाहीच, असं राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं. 

दरम्यान, बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये शिवसेना कार्यकर्ते नितीन नांदगावकर हे दुकान मालकाकडे दुकानाचं नाव आजोबा किंवा वडिलांच्या नावावरुन ठेवण्याची मागणी करताना दिसत आहेत. कराची पाकिस्तानात म्हणजेच दहशतवाद्यांच्या देशात आहे, असंही ते म्हणताना दिसत आहेत. 

 

'हमे कराची नाम से तकलीफ है....' असं म्हणत भाऊबीजेच्या दिवशी आल्या जवानांना वीरमरण आलं. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे असं ते म्हणाले होते. दुकानदारांना आपण नाव बदलण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिल्याचं म्हणत त्यांनी नावाची अक्षरं स्पष्ट दिसतील असे काही फोटोही पोस्ट केले होते.