मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आता आणखी अडचणीत सापडली आहे. तिच्या मुंबईतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याप्रकरणी महापालिकेने तिला नोटीसही बजावली आहे. तिला २४ तासात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, ती उद्या मुंबईत परतत आहे. त्यामुळे कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर १४ दिवस तिला क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तसे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. कंगनाला देण्यात आलेली नोटीस ही नियमानुसार आहे, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.
Brihanmumbai Municipal Corporation pastes notice at Bollywood actor Kangana Ranaut's Pali Hill bungalow, pointing out many alterations undertaken there without the civic body's approval: Official
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2020
मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी कंगनाला नोटीस पाठवली आहे. कंगनाने आपल्या कार्यालयात बेकायदेशीर बदल केले असून बांधकाम केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. पालिकेने कंगनाला २४ तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. कंगना उत्तर देण्यास अपयशी ठरल्यास अनधिकृत बांधकाम पाडले जाईल असे पालिकेने नोटीस देत म्हटले आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.
Now @mybmc has filed a caveat against me, really desperate to break my house, I deeply love what I built with so much passion over so many years but know that even if you break it my spirit will only get stronger .... GO ON ... pic.twitter.com/7MQRQ5h0qO
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 8, 2020
दरम्यान, सोमवारी कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या वादामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दखल दिल्याचा दावा कंगाने केला होता. ट्विटरवरुन कंगनाने आपल्या मुंबईतील ऑफिसमध्ये महापालिकेचे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी ऑफिसमधील जागेचे मोजमाप घेऊन उद्या बांधकाम पाडणार असल्याचे सांगितल्याचा दावा कंगनाने केला होता. महापालिकेचे अधिकारी ऑफिसमध्ये आल्याचे काही व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन पोस्ट केले होते.
- कंगनाला नोटीस ही नियमानुसार आहे , जर अनधिकृत बांधकाम असेल तर मालकाने स्वतः तोडावं नाहीतर पालिका कारवाई करते
- अनधिकृत बांधकाम केलं असेल म्हणून पालिकेने नोटीस दिली आहे.बांधकम अधिकृत असेल तर पुरावे द्यावेत
- पालिका कधी बदला म्हणून कारवाई करत नाही
- परदेशी प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाश्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक आहे , हा नियम आहे.