वेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!

मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

Updated: Dec 6, 2022, 03:24 PM IST
वेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!
Obscene shoot of model in the name of web series

Mumbai : मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या (web series) नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अभिनेत्री तरुणीच्या तक्रारीवरून अभिनेता व दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. परदेशी ग्राहकांसाठी असलेल्या वेबसीरिजसाठी बोल्ड सीन करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तक्रार तिने केल्यानंतर ही कारवाई करत एकाला अटक करण्यात आली. अनिरुद्ध झगडे असे अटक केलेल्या दिग्दर्शकाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यात तिघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.    

8 ऑक्टोबर 2022 रोजी मॉडेल तरुणीला एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून तिला वेबमालिकेत काम करण्याची ऑफर दिली. मालिकेचा विषय बोल्ड असून  ती भारतात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. त्यावेळी तिने वेबमालिका भारतात प्रदर्शित होणार असल्याने तिने त्यास नकार दिला होता. काही दिवसांनी त्या व्यक्तीने तिला पुन्हा दूरध्वनी करून वेबमालिका भारतात नाही तर विदेशात प्रदर्शित करणार आहोत, त्यामुळे तिने त्यात काम करावे अशी विनंती केली होती. यानंतर त्यांच्यात एक करार झाला. त्यानंतर तिला वेबमालिकेच्या चित्रीकरणासाठी कांदिवलीतील चारकोप परिसरातील आलिशान घरात बोलाविण्यात आले. तेथे तिच्यासह इतर चारजण होते. अनिरुद्ध या वेबमालिकेचा दिग्दर्शक तसेच अभिनेता होता. त्याच्यासह अमीत सहकलाकार होता तर यास्मिन ही चित्रीकरणाचे काम पाहत होती. 

वाचा : कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला

त्यानंतर फ्लॅटच्या आत, तक्रारदाराला यास्मीन आणि मेकअप आर्टिस्ट तसेच दोन पुरुष भेटले. यास्मीन सीन (Yasmin Sean) शूट करत होती आणि तिने मॉडेलला नग्न व्हायला सांगितले. मॉडेलने नकार दिल्यावर यास्मीनने तिला धमकी दिली. तरूणी मॉडेलला कराराची धमकी देऊन तिचे जबरदस्तीने अश्लील चित्रीकरण केले. तरूणी चित्रीकरण संपवून घरी निघून गेली. काही दिवसांनी तिला तिचे अश्लील चित्रीकरण एका ॲपमध्ये दिसले. ते चित्रीकरण तिच्या नातेवाईकांनी पाहिल्यानंतर तिला याबाबत विचारणा करण्यात आली. यानंतर तिने अनिरुद्धसह इतर तिघांशी संपर्क करून ती चित्रफीत हटवण्याची मागणी केली. मात्र त्यांनी ही चित्रफीत हटवण्यासाठी तरुणीकडे 15 लाख रुपयांची मागणी केली. अखेर तिने याप्रकरणी चारकोप पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीची नोंद घेऊन अनिरुद्ध झगडे, यास्मिन खान, अमीत पासवान आणि आदित्य या चौघांविरुद्ध विनयभंगासह खंडणी, फसवणूक, बदनामी करुन धमकी देणे यासह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला.    

पॉर्न साइटवर व्हिडीओ

26 नोव्हेंबरला तिचा व्हिडीओ पॉर्न साइटवर आल्याचे समजल्याने तिने यास्मीनला जाब विचारत तो हटवण्यास सांगितले आणि 29 नोव्हेंबर रोजी चारकोप पोलिसांत तक्रार केली.