आक्षेपार्ह विधान : भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल

 मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Updated: Dec 9, 2021, 01:16 PM IST
आक्षेपार्ह विधान : भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल
संग्रहित छाया

मुंबई :  FIR filed against Ashish Shelar : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आशिष शेलार यांच्या घराबाहेर शेलार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

आशिष शेलार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून शेलार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना आघाडी सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी केली. जर शेलार यांना अटक केली तर आम्ही अजून आक्रमक होऊ अशी प्रतिक्रियाही कार्यकर्त्याने दिली आहे.

आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपा वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ चर्चा केली आहे. शेलार यांच्याशी भाजपा नेते देवेंद्र फडवणीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाली. कायदा हातात घेऊन बेकायदेशीरपणे कारावई केल्यास भाजप उत्तर देण्याच्या तयारीत आहे. आशिष शेलार यांच्या घराजवळ कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. काल रात्री आशिष शेलार यांच्यावर मारिन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.