तरुणीची छेडछाड, ओला कॅब चालकाला अटक

आरोपी सुरेश यादववर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

Updated: May 23, 2018, 07:00 PM IST
तरुणीची छेडछाड, ओला कॅब चालकाला अटक  title=

मुंबई : २४ वर्षीय तरूणीची छेडछाड केल्याप्रकरणी ओला कॅब चालकाला अटक करण्यात आलीय. ही तरूणी नरीमन पॉईंट ते पवई असा प्रवास करत होती. सुरूवातीला ती गाडीत मागे बसली होती. मात्र थोड्या वेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने ती पुढच्या सीटवर येऊन बसली. त्यानंतर ओला कॅब चालक सुरेश कुमार यादव याने तिच्याशी अश्वील चाळे सुरू केले. तरूणी पवईत पोहोचताच तिने हा प्रकार आपल्या मित्राला सांगितला. त्या दोघांनी तातडीने पोलीस तक्रार केल्यावर पोलिसांनी ओला कंपनीकडून चालकाची माहिती मागवली. त्यानंतर ओला चालकाला अटक करण्यात आली. 

आरोपी सुरेश यादववर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. रात्रंदिवस धावत असलेल्या मुंबईसारख्या शहरात हा प्रकार घडल्यानं महिलांची सुरक्षा हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय.