ऑम्लेट आणि भूर्जीला थंडीचा तडका

व्रतकैवल्य, गणपती आणि नवरात्रीमुळे अनेकजण शाकाहार पाळतात. याकाळात मांसाहार वर्ज असल्याने अंड्यांची मागणी कमी असते. 

Updated: Nov 18, 2017, 02:17 PM IST
ऑम्लेट आणि भूर्जीला थंडीचा तडका title=

मुंबई : वाढती थंडी आणि महाग झालेल्या भाज्या यामुळे एरवी स्वस्त समजल्या जाणाऱ्या अंड्यांचाही भाव वाढला आहे. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली आणि त्याचबरोबर किरकोळ बाजारात पाच रुपयांना मिळणाऱ्या अंड्याची किंमत आता ६ रुपये झाली आहे. 

थंडीमुळे वाढतोय अंड्यांचा भाव

या आठवड्यात हाच दर आणखी वाढून साडेसहा रुपये झाला होता. व्रतकैवल्य, गणपती आणि नवरात्रीमुळे अनेकजण शाकाहार पाळतात. याकाळात मांसाहार वर्ज असल्याने अंड्यांची मागणी कमी असते. 

मुंबई-ठाण्यात अंडी थेट हैदराबादहून

मात्र थंडी सुरू झाल्यावर अंड्यांना मागणी वाढते. मुंबई, ठाणे आणि उपनगरात ८५ टक्के अंडी हैद्राबादमधून येतात. उर्वरित १५ टक्के अंडी पुणे, सातारा, कोल्हापूर येथून येतात. थंडीमुळे वाढलेली मागणी हे भाववाढीमागचं मुख्य कारण आहे.