Omicron | महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, या ठिकाणी आढळला पहिला पॉझिटिव्ह

ज्याची भिती होती, अखेर तेच झालंय. राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron variant) शिरकाव झाला आहे. 

Updated: Dec 4, 2021, 08:19 PM IST
Omicron | महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, या ठिकाणी आढळला पहिला पॉझिटिव्ह

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : ज्याची भिती होती, अखेर तेच झालंय. राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron variant) शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivali) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमाक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा पॉझिटिव्ह रुग्णाला प्रवासाचा इतिहास होता. ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून हा रुग्ण आला होता. (Omicron in mumbai Man returned from foreign country tested Omicron positive in Kalyan Dombivali maharashtra new variant of coronavirus)

हा पहिला ओमायक्रॉनबाधित रुग्णाचं वय हे 33 वर्ष आहे. या व्यक्तीने दक्षिण आफ्रिका, दिल्ली आणि मुंबई असा प्रवास केला होता. दरम्यान कल्याण डोंबिवलीत सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. तसेच आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने कोरोना लसीचा एकही डोस घेतला नव्हता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या सर्वांची निगेटिव्ह आली आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आणखी कोणी आलं होतं का, याचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.