मुंबई : अंगारकी चतुर्थीनिमित्त आज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे. रात्रीपासूनच गणेशभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईनं सिद्धिविनायक मंदिर उजळून गेलं आहे. गर्दीचा विचार करता मंदिर परिसरात सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शनादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी दादर स्टेशन ते सिद्धिविनायक मंदिर एसी बसेसची मोफत सोय करण्यात आली आहे. तर पुण्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाईच्या दर्शनालाही पुणेकरांनी गर्दी केली आहे.