महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रूक्मिणीच्या पुजेसाठी मुख्यमंत्री कारने रवाना

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री रवाना 

Updated: Jun 30, 2020, 03:47 PM IST
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रूक्मिणीच्या पुजेसाठी मुख्यमंत्री कारने रवाना  title=

कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपुरला रवाना झाले आहेत. कारने मुख्यमंत्री, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील रवाना झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीनिमित्ताने मोठ्याप्रमाणात वारी रद्द करण्यात आली. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रूक्मिणी यांची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री रवाना झाले आहेत. बुधवारी पहाटे २.३० वाजता मुख्यमंत्री आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. यासाठी आजच मुख्यमंत्री आणि कुटुंबिय पंढरपूरला रवाना झाले आहेत. 

Posted by Sant Tukaram Maharaj ( Dehu ) on Tuesday, June 30, 2020

वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपुरला पूजेकरता जाणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी सोमवारी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी फक्त मुख्यमंत्र्यांचे कुटुंबिय आणि मानाचे वारकरी जे पूजा करणारे आहेत त्यांनाच फक्त गाभाऱ्यात आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. 

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे एस टी बसमधुन पंढरीकडे प्रस्थान ! #FacebookDindi Exclusive Live

Posted by Sant Tukaram Maharaj ( Dehu ) on Tuesday, June 30, 2020

p>यंदा विठ्ठल ज्ञानदेव बडे हे मानाचे वारकरी विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहेत. बडे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळचे रहिवाशी आहेत. यंदा दर्शन रांग नसल्याने मंदिर समितीमधून मानाचे वारकरी निवडण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या ६ जणांमध्ये चिठ्ठी काढून निवडण करण्यात आली. 

 

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच पंढरपुरात सात लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. वारकरी सेवा संघाने पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत १०० वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरात येण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. वारीतील महत्त्वाच्या परंपरेतील नगर प्रदक्षिणा, स्नान आणि गोपाळकाला सोबत पौर्णिमेपर्यंत मुक्कामास परवानगी मिळावी, अशीही या वारकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी होणार आहे.