अशोक सावंत हत्याप्रकरण : एका अल्पवयीन मुलाला अटक

शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत हत्याप्रकरणात एका अल्पवयीन मुलाला समता नगर पोलिसांनी काल अटक केली आहे.

Updated: Jan 10, 2018, 03:00 PM IST
अशोक सावंत हत्याप्रकरण : एका अल्पवयीन मुलाला अटक title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत हत्याप्रकरणात एका अल्पवयीन मुलाला समता नगर पोलिसांनी काल अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचा हत्येमध्ये थेट सहभाग आहे. जी ऑटो रिक्षा हत्येसाठी वापरण्यात आली त्यात तो बसला होता.

हा अल्पवयीन मुलगा तोच...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक सावंत ज्या स्कुटरने घरी जात होते तिला या मुलाने लाथ मारली. आणि सावंत यांना रस्त्यावर पाडले. हत्येप्रकरणी रिक्षा चालक गणेश जोगदंड आणि रिक्षा पुरवणारा काँट्रॅक्ट किलर सोहेल दोडीया या दोन आरोपीना पोलिसानी घटनेच्या दुसऱ्या दिवशी अटक केली होती. बोरिवली न्यायालयाने काल या दोघांची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केलीय.

जग्गा पवारसोबतही वाद

त्यामुळे आता या प्रकरणात एकूण तीन जण अटकेत आहेत. अल्पवयीन मुलाला आज न्यायालयापुढे सादर केलं जाईल. या प्रकरणात जग्गा पवार ही व्यक्ती मुख्य सूत्रधार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अशोक सावंत यांच्याशी जग्गा पवार याचा तीन वर्षांपूर्वी वाद झाला होता.

तपासासाठी ६ पथके

मात्र अद्यापही हत्येमागचे कारण उलगडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 6 पथके तयार करण्यात आली असून त्यापैकी काही शहराबाहेर रवाना झाली आहेत.