परमबीर सिंह यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश; दोषी आढळल्यास कारवाईची शक्यता

पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर अतिरिक्त महासंचालक संजय पांडे यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.  

Updated: Apr 10, 2021, 08:46 PM IST
परमबीर सिंह यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश; दोषी आढळल्यास कारवाईची शक्यता

दीपक भातुसे, झी मीडिया मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर अतिरिक्त महासंचालक संजय पांडे यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
 परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित पत्रातही परमबीर सिंह यांचा उल्लेख करण्यात आला होता. कोणत्याही प्रकरणी परमबीर सिंह दोषी आढळल्यास त्यांच्यावर सरकारकडून कारवाई होऊ शकते.
 
 पोलीस आयक्तांक़डून 30 मार्चला अहवाल देण्यात आला होता. 1 एप्रिल रोजी चौकशीचे आदेश काढण्यात आले होते. अहवालात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 

परमबीर यांच्यावर खालील मुद्द्यांवर चौकशी होणार

  •  सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्यातील संबंधावर होणार चौकशी
  • अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात परमवीर सिंग यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात कसूर केली का?
  • या स्फोटक प्रकरणी अधिवेशन सुरू असताना तातडीने राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात परमवीर सिंग यांनी निष्काळजी पणा दाखवला का?
  • परमवीर सिंग यानी अखिल भारतीय सेवा नियमांचा भंग केला आहे का?
खाते अंतर्गत चौकशी होत राहते चौकशी करणे हा सरकारचा अधिकार आहे . परमबीर सिह यांनी जर आपण  तसे काही  केले नाही तर घाबरायचे कारण नाही.

 नवाब मलिक, मंत्री