Crime News : पनवेल हादरलं! घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाचा महिलेवर अत्याचार

Crime News : रविवारी घडलेल्या या प्रकाराने पनवेलमध्ये खबळब उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे

Updated: Jan 31, 2023, 11:48 AM IST
Crime News : पनवेल हादरलं! घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाचा महिलेवर अत्याचार

Crime News : पनवेलमध्ये (panvel) रिक्षातून (auto rickshaw) घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्काराच्या या घटनेनं पनवेल हादरलं आहे. रविवारी मध्यरात्री घरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेवर रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानेच सामूहिक बलात्कार (Woman gang-raped by auto driver)  केला. आरोपींनी निर्मनुष्य परिसर पाहून एका पडक्या इमारतीच्या छतावर नेऊन महिलेसोबत बलात्कार केला. या घटनेनंतर महिलेने पोलीस (Panvel Police) ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारो दोन्ही आरोपींनी अटक केली आहे.

अविनाश चव्हाण (22) आणि सूरज देवडे (21) अशी या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. रविवारी (30 जानेवारी) मध्यरात्री हा सर्व प्रकार समोर घडलाय. पीडित महिला ही खोपोली येथील एका लेडीज बारमध्ये वेट्रेस म्हणून काम करते. रविवारी रात्री कामावरून परतत असताना ही महिला पनवेलच्या ओरियन मॉलजवळच्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली. त्यानंतर घरी जाण्यासाठी ती हॉटेलसमोर रिक्षाची वाट पाहत होती. त्यावेळी अविनाश आणि सूरज तिथे आले. त्यानंतर दोघांनी महिलेकडे चौकशी केली. यानंतर दोघांनी 'आमची रिक्षा हॉटेलच्या मागे आहे, आम्ही तुम्हाला घरी सोडतो,' असे सांगितले.

त्यानंतर महिला रिक्षात बसली. दोघांनी महिलेने सांगितलेल्या पत्त्यावर न नेता एका निर्जनस्थळी रिक्षा नेली. तिथे पोहोचताच दोघांनी महिलेला जबरदस्तीने एका पडक्या इमारतीत नेले. यानंतर आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर दोघांनी तिथून पळ काढला. महिलेने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पनवेलच्या एका चाळीतून अटक केली.