सव्वा दोन तासांनंतर पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वरून निघाले

नाराज पार्थ पवार शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरुन निघाले आहेत.

Updated: Aug 13, 2020, 11:50 PM IST
सव्वा दोन तासांनंतर पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वरून निघाले

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाराज पार्थ पवार शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरुन निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची समजूत काढण्यासाठी बोलावलं होतं. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत. 

पार्थ अपरिपक्व आहेत, माझ्या नातवाच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. आजोबांचे हे शब्द पार्थ पवार यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या.

शरद पवारांच्या वक्तव्याने पार्थ दुखावले, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

साडेसात वाजण्याच्या सुमारास पार्थ पवार हे सिल्व्हर ओकला गेले आणि बंद दाराआड या कुटुंबियांमध्ये बरीच चर्चा झाली. सव्वा दोन तासानंतर पार्थ पवार बंगल्याबाहेर आले, पण त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

कालही सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती. ती बैठक संपल्यानंतर अजित पवारही प्रतिक्रिया न देता बाहेर पडले होते. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना सिल्व्हर ओकवर बोलावलं होतं. सिल्व्हर ओकवर सुप्रिया सुळे यांच्यासोबतच शरद पवारही होते, त्यामुळे पार्थ पवार यांची शरद पवारांसोबतही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.