CET आणि MPSC परीक्षेसाठी लोकलने प्रवासाची परवानगी

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

Updated: Sep 24, 2021, 10:59 PM IST
CET आणि MPSC परीक्षेसाठी लोकलने प्रवासाची परवानगी title=

मुंबई : कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी, सक्षम प्राधिकरणाने उमेदवारांना मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये लोकल ट्रेन सेवेद्वारे प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.

सीईटीच्या विद्यार्थ्यांना 10 ऑक्टोबर पर्यंत तर एमएससीच्या उमेदवारांना 25 सप्टेंबर, 2021 पर्यंत लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

लोकलने प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना आधीच लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.