राज ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Petition filed against Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

Updated: May 6, 2022, 11:14 AM IST
राज ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल  title=

मुंबई : Petition filed in Bombay HC seeks FIR under sedition against Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतमुंबई उच्च न्यायालयात  याचिका दाखल करण्यात आली आहे, याबाबतचे वृत्त ANI ने दिले आहे. आता न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मेच्या औरंगाबाद सभेच्या संदर्भात देशद्रोह आणि उपद्रव निर्माण करण्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील हेमंत पाटील या कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली असून त्यावर आज तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे. एका एनजीओचे प्रमुख असलेल्या पाटील यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी एक मेळावा आयोजित केला होता. ज्यामध्ये ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बोलले. ज्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशांतता निर्माण होऊ शकते ज्यामुळे राज्यातील शांतता भंग होऊ शकते. त्यांनी मनसे अध्यक्षाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ठाकरे यांनी 1 मे रोजी त्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांवर "जातीच्या राजकारणात महाराष्ट्राचे विभाजन" केल्याचा आरोप केला होता आणि पवार हे नास्तिक असल्याचेही जोडले होते. त्यांच्या भाषणानंतर औरंगाबाद पोलिसांनी मनसे प्रमुखांच्या सभेचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याचा अल्टिमेटम दिला होता, जर ते अयशस्वी झाले तर ते 4 मे पासून अजानच्या तुलनेत दुप्पट हनुमान चालीसा वाजवतील, असा इशारा दिला होता. औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळ मैदानावर आयोजित सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी हा इशारा दिला होता.
 
दुसरीकडे मुंबई पोलिसांनी मंगळवारी मनसे कार्यालयातून लाऊडस्पीकर जप्त केले आणि पक्षाच्या चांदिवली युनिटचे प्रमुख महेंद्र भानुशाली आणि इतरांना मंगळवारी ताब्यात घेतले. 12 एप्रिल रोजी मनसे प्रमुखांनी महाराष्ट्र सरकारला 3 मे च्या आत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला. दरम्यान, काल पत्रकार परिषद घेऊन हा सामाजिक प्रश्न आहे. ते जर भोंगे काढणार नसतील तर आम्ही हनुमान चालीस पठण करणार, असे राज ठाकरे यांनी पुन्हा सांगितले.