मुंबई: पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर २१ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर १८ पैशांनी कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८४ रुपये २८ पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७६ रुपये ८८ पैसे झालाय.
दिल्लीतही पेट्रोलचे दर २१ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ७८ रुपये ७८ पैसे प्रति लिटर असेल तर डिझेलच्या किंमती प्रति लिटर १७ पैशांनी कमी झाल्यात. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ७३ रुपये ३६ पैसे झालाय.
गेल्या १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसतेय. मात्र पेट्रोल अजूनही ८० च्या खाली येत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी आहे.
Petrol & diesel prices in #Delhi today are Rs 78.78 per litre (decrease by Rs 0.21) & Rs 73.36 per litre (decrease by Rs 0.17),respectively. Petrol & diesel prices in #Mumbai today are Rs 84.28 per litre(decrease by Rs 0.21) &Rs 76.88 per litre (decrease by Rs 0.18), respectively pic.twitter.com/NdWrcgQ6gY
— ANI (@ANI) November 4, 2018