मुंबई : राज्यात आजपासून प्लास्टिक वापण्यावर बंदी घालण्यात आलेय. त्यामुळे यापुढे कोणी प्लास्टिक पिशवी बाळगल्यास ५ हजारापासून ते २५ हजारांपर्यंत दंडाची कारवाई होणार आहे. दुकानदार, मॉलधारकांसह ग्राहकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच तिसऱ्यांदा जो कोणी सापडेल त्याला तीन महिन्यांची तरुंगाची कारवाई आणि २५ हजारांचा दंड होणार आहे. त्यामुळे प्रत्येकांने यापुढे कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आलेय.
- प्लास्टिक पिशव्या (हॅंडल असलेल्या आणि नसलेल्या)
- फ्लास्टिक चमचे
- प्लास्टिक कप, ग्लास, स्ट्रॉ
- थर्माकोल ताट, ग्लास आणि वाट्या
- उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लास्टिक
- अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
- प्लास्टिक व थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तू
- रेनकोट
- नर्सरीमद्ये वापरले जाणारे प्लास्टिक
- टिफीन, डिस्पोजेबल बॅग
- अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या
- ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या
- औषधांचे वेष्टन
- अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या
- कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक
- फ्रिज, टीव्ही उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल
- बिस्कीट, वेफर यांच्या पुड्यांचे वेष्टन
- सर्व दुकाने व आस्थापना
- सार्वजनिक ठिकाणे
- सर्व सागरी किनारे
- बस स्थानके
- रेल्वे स्थानके
- वने व संरक्षित वने
- इको सेन्सेटिव्ह क्षेत्र
- दुकानदार
- मॉल्स
- कॅटरर्स
- घाऊक व किरकोळ विक्रेते
- वितरक
- वाहतूकदार
- मंडई
- स्टॉल
- पहिल्यांदा सापडल्यास ५००० रुपये दंड
- दुसऱ्यांदा सापडल्यास १०,००० रुपये दंड
- तिसऱ्यांदा नियम तोडल्यास २५ हजार रुपये आणि तीन महिने तुरुंगवास