PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, खातेदारांचा उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ

 पीएमसी खातेदारांचा (Pmc Bank Account Holders ) मुंबईत उच्चन्यायालया बाहेर गोंधळ घातला.  

Updated: Nov 19, 2019, 04:55 PM IST
PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली,  खातेदारांचा उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ

मुंबई : पीएमसी खातेदारांचा (Pmc Bank Account Holders ) मुंबईत उच्चन्यायालया बाहेर गोंधळ घातला. पैशांबाबत न्यायालय निर्णय घेऊ शकत नसल्याच्या माहितीनंतर खातेदार आक्रमक झालेत. दरम्यानस पीएमसी (PMC) बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी यावेळी घोषणाबाजी केली. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी 'आरबीआय चोर है' च्या घोषणाही दिल्या. 

पीएमसी खातेदारांनी मुंबई हायकोर्टाबाहेर गोंधळ घातला. खातेदारांच्या पैशांबाबत कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही असं सांगितल्यानंतर खातेदार आक्रमक झाले आणि त्यांनी गदारोळ करत घोषणाबाजी केली. पीएमसी बँक घोटाळ्यात आज उच्च न्यायालयात आरबीआयने ( RBI) हे शपथपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार आहे.

Hdil ला नियमांच्या विरोधात जाऊन कर्ज दिल्याने पीएमसी  खातेधारकांना फटका बसल्याचं आरबीआयनं शपथपत्रात मान्य केले आहे. RBI नं हायकोर्टात हे शपथपत्र दाखल केले आहे. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. खातेधारकांना लवकरात लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न आरबीआय करतंय, असे आरबीआयने न्यायालयात सांगितले. कोणी किती पैसे काढायचे याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. 

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पीएमसी बँकेतील खातेदारांना तातडीने पैसे मिळावेत आणि त्यांना त्यांचे लॉकर हाताळता यावेत यासाठी एक नियमावली करण्यात यावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.