मुंबई : Devendra Fadnavis allegations : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी माहिती घेण्यासाठी बोलवले असेल. त्यांच्यावर कारवाई करणे अडचणीत टाकणे असा सरकारचा हेतु नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. तर हा सरकारचा विषय आहे, असे सांगून संजय राऊत यांनी प्रतिक्रीया देणे टाळले.
पोलीस बदली घोटाळा बाहेर काढल्यामुळेच मला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. मात्र या नोटिशीला उत्तर देईल, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
मुळात पोलीस बदली घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरु असताना मुंबई पोलिसांनी आपल्याला नोटीस कशी दिली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र उद्या 11 वाजता बीकेसी पोलिसांत हजर राहून आपण उत्तर देऊ, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.