पोलीस भरतीत 'मुन्नाभाई'! भावी पोलिसांचा कॉपीचा कानमंत्र पाहून डोकं धराल

Police Bharti Exam : महाराष्ट्रातील भावी पोलीस कसे असतील हे सत्य दाखविणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेत भावी पोलिसांचा कॉपीचा कानमंत्र पाहून तुमचं डोकं चक्रावेल. 

नेहा चौधरी | Updated: May 9, 2023, 08:40 PM IST
पोलीस भरतीत 'मुन्नाभाई'! भावी पोलिसांचा कॉपीचा कानमंत्र पाहून डोकं धराल title=
police recruitment exam candidate uses bluetooth mumbai news

Maharashtra Police Recruitment Exam 2023: जे पोलीस भविष्यात आली सुरक्षा करणार आहेत. चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचं काम त्यांचावर असणार आहे. याच भावी पोलिसांचा एक प्रताप उघड झाल्याने सगळ्यांच धक्का बसला आहे. नुकतीच दहावी आणि बारावीची परीक्षा झाली. या परीक्षेदरम्यान  विद्यार्थ्यांनी कॉपी करु नयेत म्हणून पोलिसांची त्यांचावर नजर होती. पण हे बघा ना भावी पोलिसांनी पोलीस भरती परीक्षेत कॉपी केली आहे. मुंबई पोलीस दलातील 7076 कॉन्स्टेबल पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी हा गैरप्रकार उघड झाला आहे. (police recruitment exam candidate uses bluetooth mumbai news )

पोलीस भरतीत 'मुन्नाभाई'!

नवीन पिढी ही टेक्नॉलाजी फ्रेंडली आहे. त्यामुळे या परीक्षेत अनेक मुन्नाभाई दिसून आले आहेत. पोलिसांनी मुंबईतील चार जणांबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत आधुनिक प्रकारे कॉपी केली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून मायक्रो माईक, इअरबड आणि पेन जप्त केले आहेत. 

असे सापडले मुन्नाभाई!

खरं कुठल्याही परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रानिक्स यंत्र घेऊन जाण्यास मनाई आहे. पण या भावी पोलिसांनी वर्गाबाहेर बॅगेत मोबाईल ठेवले होते.  परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांना हळू आवाजात कोणी तरी पुटपुटतंय. त्यांनी लगेचच वर्गातील झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. तर त्यांना चार उमेदवाऱ्यांचा कानात छोटे ब्ल्यू टूथ दिसून आलेत धक्कादायक म्हणजे त्या कॉपी बहाद्दरांना डॉक्टरांना नेलं असताना त्यांचा कानातून इअरबड काढण्यात आले.  त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

कुठे घडला प्रकार? 

मुंबईतील भांडुप, मेघवाडी, गोरेगाव आणि कस्तुरबा मार्ग परिसरातील केंद्रांवर हा धक्कादायक प्रकार घडून आला. 

काय आहे आरोपींची नाव?

युवराज जारवाल हा 19 वर्षांचा असून तो गंगापूरमधून मुंबईला पोलीस भरतीसाठी परीक्षे देण्यासाठी आला होता. दुसऱ्या कॉपी बहाद्दराचं नाव रवींद्र काळे असं आहे. त्याने परीक्षेदरम्यान पेनमध्ये सिम कार्ड लावलं होतं. त्याद्वारे तो मित्राशी बोलून पेपर सोडवत होता. तो ज्या मित्राशी बोलत होता त्याचं नाव शिवम बेलुसे असं आहे. 

जोगेश्वरी पूर्वमधील परीक्षा केंद्रातून नितेश आरेकर याला ताब्यात घेण्यात आलं आहे. नितेश हा बीडमदील शिरूनहून पेपर देण्यासाठी आला होता. तो सिम कार्डद्वारे अशोक ढोले या व्यक्तीशी बोलत होता. तर भांडुपमधील परीक्षा केंद्रातून बबलू मेंढरवाल कानात ब्ल्यू-ट्युथ वापरत होता.