मुंबई जलमय : मदत न करता मदत केलेल्या दाव्याची अशी पोलखोल

 २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीने अनेकांची त्रेधातिरपट केली. जलमय मुंबईत अनेकांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. कारण घरी जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. मात्र, संकटात सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र, मदत न करता आपण कशी मदत केली याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: Aug 31, 2017, 05:14 PM IST
मुंबई जलमय : मदत न करता मदत केलेल्या दाव्याची अशी पोलखोल title=
छाया सौजन्य : ट्विटर

मुंबई :  २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीने अनेकांची त्रेधातिरपट केली. जलमय मुंबईत अनेकांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. कारण घरी जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. मात्र, संकटात सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र, मदत न करता आपण कशी मदत केली याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

२६ जुलै २००५ नंतर २९ ऑगस्ट २०१७ ला अतिवृष्टीमुळे मुंबई जलमय झाली आणि मुंबईकरांची झोप उडाली. अनेक जण तुंबलेल्या पाण्यात अडकले. पावसाने दमदार बॅटिंग केल्याने रस्ता आणि रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले. त्यामुळे अनेकांचे हाल झालेत.

 

घरी परतण्याचा मार्ग बंद झाल्याने अनेकांना आहे त्या ठिकाणी राहावे लागले होते. मात्र, संकटात सापडलेल्यांना अनेकांनी आपआपल्या परिने मदत केली. यात राजकीय पक्षही आघाडीवर होते. मात्र, काही राजकीय पक्षांनी मदत न करता आपण कशी मदत केली याची सोशल प्रसिद्धीही केली. मात्र, या मदतीची पोलखोल झालेय.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायल होत आहे. त्यात ओरिजनल आणि फेक असे दोन्ही फोटो दाखविण्यात आले आहे. हे फोटो कोणी पोस्ट केले याची पुष्टी झी २४ तास करत नाही.