मुंबई : 'मला वाटते कोकणवासीय चाकरमानी आणि प्रवांशांची चेष्टाच या सरकारने चालविली आहे. केंद्रांची जी रेल्वे कोकणवासीयांसाठी तयार होती त्यांना मान्यता सहमती दिली नाही. आयत्यावेळी उशिरा दिली. एसटीच्या बाबतीतही तेच झाले. एसटी उशिरा सोडली तोपर्यंत ९० टक्के चाकरमानी गावाला पोहचले होते आजही ते पोहचलेले आहेत. खाजगी वाहनांना अवाजवी पैसे देऊन जावे लागले. टोल माफी केली. १२ ऑगस्टला सांगता गावी जा, १३ ऑगस्टला माफी करता. त्याचबरोबर सांगता चेकिंग करा. शंभर पन्नास रुपयांची टोलमाफी करणार आणि हजार हजार दोन हजार चेकिंगला लावणार. हे कुठल्या प्रकारचे नियोजन आणि कुठल्या प्रकारचा समन्वय आहे ? आणि त्याच्यामुळे कोकणवासियांकडे पुरते दुर्लक्ष या उत्सवामध्ये आणि गावाकडे जाताना झालेले आहे, असे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आज मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, या कोकणवासियांकडे जे दुर्लक्ष आणि हेळसांड झालेली आहे, त्याची किंमत सरकारला चुकवावी लागणार आहे. कारण आता रेल्वे गेली त्याच्यामध्ये फक्त दहा वीस पॅसेंजर होते. ही सुविधा जर वेळेत केली असती, तर कमी पैशात, सुरक्षितरित्या तपासणी करत, चाकरमानी आपल्या गावी जाऊ शकला असता. पण कुठल्याही प्रकारचे नियोजन असल्याने, कोकणवासीयांच्या प्रवासाचा आणि उत्सवाचा बट्ट्याबोळ सरकारने केला आहे.
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी काही दिवसांपूर्वी मोठी घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रक १५ ते ५ सप्टेंबर दरम्यान १६२ गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी माहिती दिली.
कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. १५ ऑगस्टला पहिली गाडी सुटणार आहे. ती १६ ऑगस्टला कोकणात दाखल होईल. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत सुटणाऱ्या १६२ गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. ८१ अप तर ८१ डाऊन अशा गाड्या धावणार आहेत.