मुंबई: काल थोडीफार उसंत घेतल्यानंतर शनिवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने मुंबईकरांना मुसळधार पावसाच्या सरी अनुभवयाला मिळत आहेत. आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरातील आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. पवई, घाटकोपर, वांद्रे, चेंबूर, लालबाग, सायन, दादर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी हे भाग पावसाने न्हाऊन निघाले. पहाटेपासून बरसत असणाऱ्या पावसामुळे मुंबईत सध्या सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे.
मुंबईतील पावसाविषयी हवामान खात्याचे महत्त्वपूर्ण भाकीत
तर ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली परिसरातही आज सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही साधारण अशीच परिस्थिती आहे. याठिकाणी जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, म्हणाले...
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या राज्यातील वाटचालीत विघ्न येण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने तसे काही घडले नाही. त्यामुळे येत्या काही तासांतच मान्सून तळकोकणात दाखल होईल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली होती.