मोजोस पब आग : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 

Updated: Dec 29, 2017, 11:41 AM IST
मोजोस पब आग : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख title=

मुंबई :  कमला मिल कंपाऊंटमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबच्या टेरेस्टला रात्री आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर २० जण जखमी झालेत. दरम्यान राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दुर्घेटनेबद्दल दुख व्यक्त केले.

मृतांच्या आत्म्यास शांती मिळो, त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.  जखमी लवकरात बरे होवोत. अग्निशमन दलाने केलेल्या तात्काळ कार्यवाहीबद्दल त्यांचे कौतूक केले. 

मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

जखमीं लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 
मुख्यमंत्र्यांनीही यावर दु:ख व्यक्त करत महापालिका आयुक्तांना सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगितले. 

रात्री एक वाजता पहिला रुग्ण आला. एकूण १२ रुग्ण आले जे ३ ते ३० टक्के भाजले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. ते सर्व स्टेबल आहेत. काही रुग्ण घरी गेले तर काही दुसऱ्या रुग्णालया गेले. आता KEM मध्ये एकही जखमी रुग्ण नसल्याचे केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.  १४ जण जे मृत होते त्यापैकी बहुतके सर्व मुख्यतः सफोकेशनमुळे मृत्यूमुखी पडल्याचेही ते म्हणाले.  

आगीत १५ पैकी १२ महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

आग भडकली 

जखमींना केईएम, भाटीया आणि ऐरोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  आग इतकी मोठी होती की इमारतीच्या गच्चीवर बांधण्यात आलेले बांबू आणि प्लास्टिकचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले. सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग आणखी भडकली.