मुंबईत मोजोस पब आग प्रकरणी दोघांना अटक

कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस हॉटेल यांना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. 

Updated: Dec 29, 2017, 10:39 AM IST
मुंबईत मोजोस पब आग प्रकरणी दोघांना अटक title=

मुंबई : कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस हॉटेल यांना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. 

मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात असा असून, ऱ्हतेश संघवी, जिगर संघवी, अभिजित मानका आणि इतर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, जिवितास कारणीभूत, अग्नी विरोधक यंत्रणा यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत.

चार तासानंतर आग आटोक्यात

या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकर त्यांना अटक दाखवली जाईल असं वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ही आग इतकी भीषण होती की यांत टेरेसवर बांधण्यात आलेले बांबू आणि प्लास्टिकचं छप्पर जळून खाक झालंय. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.