मुंबई : Sanjay Raut on Presidential Election : राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याबाबत चर्चा झाली. प्रत्येकाचे मत समजून घेतले जात आहे. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी नाराजीवर स्पष्टीकरण दिले. मला 'सामना'त काम होते, त्यामुळे बैठक संपल्यावर मी निघून गेलो. मी नाराज नाही. मी बैठकीतून उठून गेलो, या बातम्या दिल्या ती लोक मूर्ख आहेत. अशा बातम्या देण्यासाठी एक यंत्रणा काम करतेय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आमच्या कालच्या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येकाच मत आम्ही समजून घेतल आहे. द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही. यापूर्वी आम्ही प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी आम्ही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेला असे निर्णय घेण्याची परंपरा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे. यशवंत सिन्हा यांनाही आमच्या सद्भावना आहेत. लोक भावना काय आहे, यानुसार निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी आम्ही प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी आम्ही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. शिवसेना पक्षप्रमुख कुठल्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीत. आम्ही त्यांना निर्णय घेण्यास सांगितला आहे, असे राऊत म्हणाले.