मुंबई : पंजाब नॅशनल बँकच्या अपहाराप्रकरणी आता मोठे मासे गजाआड व्हायला सुरूवात झालीय. बँकाच्या महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याला सीबीआयनं अटक केलीय.
राजेश जिंदाल असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. २००९ ते २०११ या काळात जिंदाल ब्रॅडी हाऊस शाखेत कार्यरत होता. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकच्या अपहाराप्रकरणी आता मोठे मासे गजाआड व्हायला सुरूवात झालीय. बँकाच्या महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याला सीबीआयनं अटक केलीय.
जिंदाल याला अटक केल्यानंतर काल रात्री नीरव मोदीची कंपनी फायर स्टार डायमंड्स या कंपनीचा सीईओ आणि उद्योगपती मुकेश अंबानींचा चुलत भाऊ विपुल अंबानीला अटक करण्यात आलीय. याशिवाय नीरव मोदीच्यावतीने पंजाब नॅशनल बँकेशी करार करणाऱ्या एक महिला आणि तीन पुरुष अधिकाऱ्यांनाही सीबीआयनं अटक केली आहे.
कविता मणिकर, अर्जुन पाटील, कपिल खंडेलवाल, नितेन शाही अशी त्यांची नावं आहे. हे सर्व जण नीरव मोदीच्या तीन कंपन्या डायमंड आर एस, स्टेलर डायमंड, सोलर एक्सपोर्ट याच्यासाठी काम करत होते.
सीबीआयनं ३१ जानेवारीला दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे त्यांना अटक करण्यात आलीय. दरम्यान सलग सहाव्या दिवशी ईडीनं विविध ठिकाणी छापे मारून तब्बल १० कोटींची संपत्ती जप्त केलीय.