मुंबईच्या पावसामुळे रूळांवर पाणी, रेल्वेला कासवगती

रेल्वे मार्गावरील रुळावरांवर पाणी साचल असून, पाणी हटवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Updated: Jul 9, 2018, 01:47 PM IST
मुंबईच्या पावसामुळे रूळांवर पाणी, रेल्वेला कासवगती title=

मुंबई: सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मध्यरेल्वेच्या वाहतूकीचे पुरते बारा वाजले आहेत. आज धुवांधार पावसानं कल्याण, डोंबिवली, कळवा, ठाण्यात रुळावर पाणी आल्य़ानं लोकल वाहतूक संथगतीनं सुरू आहे. सायन, माटुंगा रेल्वे मार्गावरील रुळावरांवर पाणी साचलं. पाणी हटवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

लांबपल्ल्याच्या वाहतूकीवर मोठा परिणाम

पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या वाहतुकीवर पावसाचा मोठा परिणाम झालाय. पावसाचा जोर साततत्यानं वाढत असल्यानं लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या डहणूतच थांबवण्यात आल्या आहेत. वसई, विरार, नालासोपाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरूच अधून मधून मुसळधार पावसासह संततधार सुरूच आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी पसलं. परिसरातील पूर्णपणे जनजीवन विस्कळीत आहे. मुसळधार पावसामुळे वसई, विरार परिसरातल्या सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आलीय. 

पावसाच्या सरीवर सरी

नालासोपाऱ्यात पश्चिम रेल्वेचे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बोरीवली ते विरार दरम्यानची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं सुरू आहे. आज दिवसभर उत्तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इकडे कांदिवली, बोरीवली, मालाड, दहीसर, अंधेरीमध्ये सतत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

दरम्यान, काल पासून उपगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे अधून मधून विश्रांती शेत असल्यामुळे पाणी कमी प्रमाणत जमा होत आहे कांदिवली बोरिवली मालाड दहिसर अंधेरी या भागात सतत पावसाची सररी सुरू आहे