राज्यात २४ तासात पाऊस बरसणार

मान्सून केरळात दाखल झालाय. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी  शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 2, 2017, 06:20 PM IST
राज्यात २४ तासात पाऊस बरसणार  title=

मुंबई : मान्सून केरळात दाखल झालाय. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी  शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात येत्या २४ तासात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत आकाश ढगाळलेले राहील तर मुंबई आणि परिसरात काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेय.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर गोव्यात येत्या २४ तासात मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह मुसळधार पावसाची तर मराठवाड्यातही पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.