हवामान विभागाचा राज्यात पावसाचा अंदाज

अनेक शहरांत सूर्याचं दर्शनच झालं नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

Updated: Nov 20, 2017, 09:27 AM IST
हवामान विभागाचा राज्यात पावसाचा अंदाज title=

मुंबई : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळी अनेक शहरांत सूर्याचं दर्शनच झालं नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

सकाळी काही ठिकाणी रिमझिम पाऊस

अंबरनाथ, बदलापूर, आणि रायगड जिल्ह्यातील रोहामध्ये आज सकाळी रिमझिम पाऊस झाला आहे. पनवेल शहरातही रिमझिम पावसाला सुरूवात झाली. अचानक वातावरण बदलल्यानंतर, हवामान विभागानेही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

राज्यात कडक थंडीला सुरूवात होत असताना, अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असले, तरी ज्या प्रकारे अतिथंडीमुळे काही पिकांना फटका बसतो, तसाच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यता वाढते.