विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात आले आहे.

Updated: Jul 30, 2020, 08:01 AM IST
विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता  title=
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

यापूर्वी ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते.  परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईत हे अधिवेशन घेणे  योग्य वाटत नसल्याने पुढे ढकलण्यात आले होते. तसेच अधिवेशनाला होणारी गर्दी कोरोना काळात योग्य नाही, असा निर्णय सर्वांचा झाल्याने हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. आता हे अधिवेशन ३१ ऑगस्ट २०२०चा लॉकडाऊन संपल्यानंतर घेण्याचे ठरले आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच 
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरानाची लागण होती. त्यामुळे अधिवेशन घ्यायचे का यावर विचारविनिमय सुरु होता. अखेर हे अधिवेशन नंतर घेण्यात यावे, यावर एकमत झाले. त्यामुळे हे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात घ्यावे असा निर्णय पुढे आला. आता हे अधिवेशन ७ सप्टेंबरला होणार आहे. तसा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आणि त्याला मान्यता देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांची मंजुरी मिळाली की हे पावसाळी अधिवेशन ठरलेल्या तारखेला होईल.