सॉफ्ट पॉर्नोग्राफीमधील राज कुंद्रा याच्या कमाईचा खुलासा, रोजचे किती उत्पन्न होते, ते जाणून घ्या

हॉटशॉट डिजीटल प्लॅटफॉर्मवर (HotShots App) पॉर्न सिनेमे (Soft Pornography Case) टाकून राज कुंद्रा (Raj Kundra) लाखो रुपये कमवत होता.  

Updated: Jul 21, 2021, 12:44 PM IST
सॉफ्ट पॉर्नोग्राफीमधील राज कुंद्रा याच्या कमाईचा खुलासा, रोजचे किती उत्पन्न होते, ते जाणून घ्या title=

मुंबई : हॉटशॉट डिजीटल प्लॅटफॉर्मवर (HotShots App) पॉर्न सिनेमे (Soft Pornography Case) टाकून राज कुंद्रा (Raj Kundra) लाखो रुपये कमवत होता. 'झी मीडिया'कडे या व्यवहारांचे एक्सक्लुझिव्ह बँक डिटेल्स हाती आलेले आहेत.  हॉटशॉटकडून ((HotShots) राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीत लाखो रुपये ट्रान्सफर होत होते. 22 डिसेंबर 2020 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान पैसे ट्रान्सफर झाल्याचे डिटेल्स समोर आले आहेत.  

सॉफ्ट पॉर्नोग्राफी प्रकरणात (Soft Pornography Case) अटक झालेल्या उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राज कुंद्र याची कमाई बँकेच्या तपशिलातून उघडकीस आली असून, तो हॉटशॉट्स (Hotshots) डिजिटल प्लॅटफॉर्मवर सॉफ्ट पॉर्नोग्राफी शेअर करुन दिवसातून लाखो रुपये कमवत असे, अशी माहिती मिळाली आहे.

Hotshots माध्यमातून राज कुंद्रा याची कमाई

HotShots App से Raj Kundra की कमाई पर बड़ा खुलासा, जानें रोजाना कितनी होती थी इनकम

'झी न्यूज'ला काही बँकेचा तपशील मिळाला आहे, त्यात असे दिसून आले आहे की राज कुंद्रा एका दिवसात हॉटशॉट्स डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन लाखो रुपये कमवत असे. बँकेच्या तपशिलात असे दिसून आले आहे की, हॉटशॉट्सवरून राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीला आतापर्यंत लाखो रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

बँक ट्रान्सफरचे डिटेल्स 

- 22 डिसेंबर 2020 रोजी XX790 खात्यात HotHit च्या खात्यातून 3 लाख रुपये आले.

- 25 डिसेंबर 2020 रोजी एक्सएच 790 खात्यात HotHitच्या खात्यातून 1 लाख रुपये आले.

- 26 डिसेंबर 2020 रोजी XX790 खात्यात HotHitच्या खात्यातून 10 लाख रुपये आले.

- 28 डिसेंबर 2020 रोजी एक्सएक्स 790 खात्यात HotHitच्या खात्यातून 50 हजार रुपये आले.

- 3 जानेवारी 2021 रोजी एक्सएच 790 खात्यात HotHitच्या खात्यातून 2 लाख 5 हजार रुपये आले.

- 10 जानेवारी, 2021 रोजी एक्सएक्स 790 खात्यात HotHitच्या खात्यातून 3 लाख रुपये आले.

-13 जानेवारी 2021 रोजी XX790 खात्यात हॉटहिटच्या खात्यातून 2 लाख रुपये आले.
- 20 जानेवारी 2021 रोजी XX790 खात्यात HotHitच्या खात्यातून 1 लाख रुपये आले.

- 23 जानेवारी 2021 रोजी XX790 खात्यात HotHitच्या खात्यातून 95 हजार रुपये आले.

- 3 फेब्रुवारी 2021 एक्सएक्स 790 खात्यात HotHitच्या खात्यात 2 लाख 70 हजार रुपये जमा झाले.

चौकशीनंतर राज कुंद्रा याला अटक 

19 जुलै रोजी म्हणजेच गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला चौकशीसाठी बोलावले होते. राज कुंद्रा रात्री 9 वाजता मुंबई गुन्हे शाखेच्या भायखळा कार्यालयात पोहोचला. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्रा याला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. त्यानंतर पहाटे 4 वाजता त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात आणि तेथून सकाळी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात नेण्यात आले.

 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी 

अटकेनंतर मुंबई पोलिसांनी 20 जुलै रोजी राज कुंद्रा याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर 23 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राज कुंद्रा याने कोर्टाला सांगितले की, मी ही कंपनी  25000 डॉलरमध्ये विकली होती आणि त्यात माझा काही भाग नाही. तथापि, पोलिसांनी सांगितले की, राज कुंद्र याने आपली कंपनी प्रदीप बक्षी यांना 25000 डॉलर्समध्ये विकली असेल तर तो कंपनीच्या 'एच अकाउंट्स' या कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सक्रिय का होता? प्रत्येक रणनीती बनविण्यात तो का गुंतला होता? व्हॉट्सअॅप चॅट्सवरून असे दिसते की प्रत्येक निर्णयात राज कुंद्रा सहभागी होता.