कुर्रsss... राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव ऐकलं का?

माझं नाव......., राज ठाकरे यांच्या नातवाला नवी ओळख....  

Updated: May 6, 2022, 01:26 PM IST
कुर्रsss... राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव ऐकलं का?  title=

मंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू आणि मिताली अमित ठाकरे यांच्या चिरंजीवाचा नामकरण सोहळा आज दुपारी होतोय. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे घराण्यातील या पाचव्या वारसदाराचं बारसं होईल. राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव 'किआन' ठेवण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र राज ठाकरे यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याची चर्चा रंगत आहे. 

गेल्या महिन्यात 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांच्या पुत्र रत्नाचा लाभ झाला. मिताली राज यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. पहिल्या नातवनाच्या आगमनाने शिवतीर्थावर आनंदाचं वातावरण होतं.