दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शनिवारी सकाळी अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. परंतु, त्यांच्या भेटीमागचं कारण मात्र गुलदस्तातच आहे.
मुंबईतल्या शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक रेसिडेन्सी' या निवसस्थानी राज ठाकरे यांनी अचानक एन्ट्री घेतली... या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
उल्लेखनीय म्हणजे, उद्या रविवारी गुढीपाडव्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे सायंकाळी ५ ते ९ वाजल्यादरम्यान मनसैनिकांना संबोधणार आहेत. यंदा शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी राज ठाकरेंना रितसर परवानगीही मिळाली आहे.
- राज ठाकरे आणि शरद पवार यांची राजकीय जवळीक वाढते आहे का?
- टोकाचा मोदीविरोध दोघांना राजकीयदृष्ट्या एकत्र आणतोय का?
- २०१४ साली मोदींच्या विजयासाठी राज यांनी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले नव्हते, आता मोदींच्या पराभवासाठी राज पवारांना साथ देणार का?
- भाजपा विरोधातील सर्व पक्षांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे का?