भारत-पाकिस्तान सामन्याला राज ठाकरेंचा आक्षेप

राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी संपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर आक्षेप नोंदवलाय.

Updated: Jun 2, 2017, 07:14 PM IST
भारत-पाकिस्तान सामन्याला राज ठाकरेंचा आक्षेप title=

मुंबई : राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी संपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर आक्षेप नोंदवलाय.

जवान शहीद होत असताना भारत-पाक मॅचेस कशा बघितल्या जातायंत. त्या स्टेडियम मध्ये शहिदांच्या जवांनासाठी एक स्टॅन्ड बांधा. त्यांनाही सामना पाहू द्या. काय चालले आहे या देशात ते त्यांनाही कळू द्या. 

सीमेवर अशी परिस्थिती कि जवानांचे कोणत्याही क्षणी प्राण जातील. त्या जवानाला सीमेवर तिथे काय वाटत असेल ? ज्या देशाने सैनिकांच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे तो देश क्रिकेट सामना पाहण्यात गुंग आहे. परकीयांनी आपल्यावर हजारो वर्षे राज्य केले. सामना पाहू नका असे आवाहन करून काही उपयोगाचे नाही. प्लेयेर्स, लोकांना कळायला हवे, असे राज यावेळी म्हणाले. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात झालीये. मात्र खरा महामुकाबला रविवारी होणार आहे.