मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून हिरवा कंदील मिळाल्यावर राजधानी एक्स्प्रेस अत्यंत वेगाने नवी दिल्लीकडे रवाना झाली. दादर स्थानकात या गाडीला थांबा नव्हता. इथून गाडी अतिशय वेगाने रवाना झाली. गाडीने अवघ्या १४ सेकंदात दादर स्थानक पार केले. दरम्यान, रोहा ते दिवा दरम्यान विजेवर पहिली लोकल धावली. त्यामुळे रायगडवासियांचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. रोहा ते दिवा गाडीला केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी हिरवा झेंडा झाखवला. आता लवकरच अलिबागकरांचेही रेल्वेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, असे प्रतिवादन यावेळी गिते यांनी केले.
New Delhi-Mumbai Rajdhani to begins operation: All you need to know about the new train https://t.co/0QSQ2J0D4B pic.twitter.com/8CQz00Eq3F
— DNA (@dna) January 19, 2019
मध्य रेल्वे मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झाले असून आजपासून दिवा ते रोहा दरम्यान विजेवर चालणारी रेल्वे सुरू झाली. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी रोहा स्थानकातून पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, अतीरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक एन. पी. सींग, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. विद्युतीकरणामुळे या मार्गावरील प्रवास वेगवान होणार असून भविष्यात या मार्गावरच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. अलिबागकरांचेही रेल्वेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती अनंत गीते यांनी यावेळी दिली.