मुंबई पोलिसांची ७ हजार गाड्यांवर कारवाई; महाराष्ट्र सरकारचा तुघलकी फर्मान

मुंबईमध्ये हजारो प्रायव्हेट गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली

Updated: Jun 29, 2020, 07:37 PM IST
मुंबई पोलिसांची ७ हजार गाड्यांवर कारवाई; महाराष्ट्र सरकारचा तुघलकी फर्मान

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी राज्य सरकार वेगवेगळे आदेश दिले आहेत. भाजप नेता राम कदमने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून प्रश्न विचारला आहे. घरापासून २ किमी अंतरापेक्षा जास्त लांब तुम्ही जाऊ शकत नाही. हा महाराष्ट्र सरकारचा तुघलकी फर्मान आहे, असं भाजप नेता राम कदम यांनी म्हटलं आहे. 

 मुंबईमध्ये हजारो प्रायव्हेट गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. काल मुंबईमध्ये हजारो प्रायव्हेट गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. ७०७५ प्रायव्हेट गाड्या मुंबईमध्ये जप्त करण्यात आल्या कारण असे देण्यात आले की दोन किलोमीटरपेक्षा अधिक  जाण्यास मनाई केली. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय तुघलकी फर्मान आहे.

बस रिक्षा ट्रेनच्या कितीतरी अधिक पटीने स्वतःची गाडी कोरोना संक्रमण लक्षात घेता सुरक्षित नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.  मेडिकल स्टोअर, हॉस्पिटल, प्रायव्हेट ऑफिस, दुकान, मार्केट होलसेल, मार्केट, लोकल पोलीस स्टेशन, बीएमसी कार्यालय, हे सर्व ठिकाण हर व्यक्तीच्या घरापासून दोन किलोमीटरच्या अंतरातच आहेत. हे सरकारने गृहीत धरले मात्र तशी वस्तुस्थिती नाही.

एखादाच कार्यालय दहा किलोमीटर अंतरावर असेल आणि तो स्वतःची गाडी घेऊन जात असेल तर महाराष्ट्र सरकार त्याची गाडी जप्त करणार. महाराष्ट्र सरकारच्या जनतेला गोंधळात टाकणाऱ्या निर्णयांमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

अशा पद्धतीने मुंबईकरांना महाराष्ट्र सरकारला त्रासात टाकता येणार नाही. गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र सरकारने जनतेला एका पैशाची सुद्धा मदत केली नाही मात्र तुमचे गोंधळात टाकणारे निर्णय जनतेसाठी त्रासाचे कारण ठरले आहेत. सुप्रीम कोर्टाला देखील सुमोटो या त्रासाला याच्यापूर्वी वाचा फोडली आहे हे सरकारला विसरून चालणार नाही महाराष्ट्र सरकारने हा आदेश ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.