राम कदमांचे महिलांबाबत वादग्रस्त विधान, भाजपचे मौन

 राम कदम यांच्या विधानाने पक्ष अडचणीत आल्याय.

Updated: Sep 5, 2018, 04:50 PM IST
राम कदमांचे महिलांबाबत वादग्रस्त विधान, भाजपचे मौन title=
संग्रहित छाया

मुंबई : घाटकोपर दहीहंडी उत्सवाच्यावेळी भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याने स्वत: ते अडचणीत आले असताना पक्षही चांगलाच अडचणीत आलाय. दरम्यान, राम कदम यांच्या विधानाबाबत भाजप नेते आणि प्रवक्त्यांनी मौन बाळगणे पसंत केलेय. तर दुसरीकडे राम कदमांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. मित्रपक्ष शिवसेनेने त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये, असे आवाहन केलेय.

ट्ववीटरवर पाहा, भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्स कसे.. धू-धू धुतायत...!

राम कदम यांच्या महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे पक्ष बॅकफूटवर गेलाय. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या महिलांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला. यावेळी कारवाई करण्याची मागणी केली. माझ्या हातात काहीही नाही, असे सांगत महिलांची समजूत काढली. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि प्रवक्त्यांची राम कदम यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्याबद्दल राम कदम यांच्याकडून भाजपने खुलासा मागवला आहे. वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओ सादर करण्याचेही पक्षाने राम कदम यांना आदेश दिले आहेत. राम कदम यांच्या विधानाने पक्ष अडचणीत आल्याने पक्षाने हे पाऊल उचलले आहे.